Monday, February 14, 2022

रीवा

आतुर होतो राणी,

आम्ही तुझ्या स्वागताला ।

ओढ त्या वळिवाची,

जणू असे चातकाला ।।


बाहुली तू अमुची सानुली,

तेजस्वी तुझी काया ।

कन्या शोभे हेमेंद्रची,

अखेर सुवर्णांचा असे तो राया ।। ( Hemendra means king of gold)


म्हणल्या अनेक ऋचा, (Rucha means stanza in prayer)

लाउनी राउळी दिवा ।

ईश्वरी वरदान लाभले,

जन्मली आज रीवा ।।


- निखिल

No comments:

Post a Comment