Saturday, May 16, 2020

Poornima

पुर्णिमा

पु न्हा पुन्हा, तुझी आठव स्मरते ।
मवूनी मजला, वेडे करते ।।

नि रागस तुझे हे, रुप सखी गं ।
मा नसी केवळ, तुच वसे गं ।।

कु णा न कळले, कधी मन भुलले ।
गोलग कसे हे, ऋणानुबंध जुळले ।।

रीता आठव, मनात ताज्या ।
हातेस तू, मनात माझ्या ।।

नि रंतर हवी मज, तुझी सोबत आता ।
     प्रार्थना माझी, करुनी नमन त्या दाता ।।


with love,
NIKHIL

Lockdown

 लाॅकडाउन

Lockdown काही संपेना, घरोघरी विवंचना ।
घर बसल्या बसल्यातरी, कसा चालवावा प्रपंच हा।।

म्हणे विद्वत्तेचा मानवा, तू या धरेवरील आविष्कार ।
परी दैनंदीन जीवनावरच कैसा, आज आला हा बहिष्कार?।।

कुणी म्हणे निसर्गाचा कोप, तर कोण म्हणे Bio weapon।
पण खरं सांगू मानवा?, This was ought to happen।।

निसर्गावरील कुरघोडी, ही अजुन कुठवर चालायची।
आणि श्रेष्ठतवाच्या हट्टापायी, कुठवर मती मारायची?।।

म्हणे बिहारमधूनही आता, दिसू लागलाय हिमालय ।
आणि ओझोन वायुचं देखिल, आता भरून आलय वलय।।

ही वेळही सरेल, आणि येइल नवी लस।
तोवर गड्या तू, फक्त घरी बस... फक्त घरी बस।।

- निखिल