Tuesday, January 16, 2024

॥ श्रीराम ॥


५०० वर्षांच्या प्रतिक्षेचा, दिसेना होता अंत ।

उन वाऱ्यात तंबूमध्ये, तरी होता राघव शांत ॥

“चलो अयोध्या” घोषणेने, फुटली चळवळीस वाचा ।

कार सेवकांच्या बलिदानाने, पडला बाबरी ढाचा ॥


चढाओढ सुरू होतीच, घेण्या श्रेय लाटून ।

प्रत्येकजण तत्पर आज, घेण्या राम वाटून ॥

हिंदुत्वाचा मिरवतात, बेमालूम मुखवटा नवा ।

सनातनी विचारांची आज, दिसे सर्वत्र वानवा ॥


मर्यादापुरूषोत्तमाच्या मर्यादेचा, अखेर वनवास सुटला ।

कोर्टकचेऱ्या मागे सारून, भूमीपुजनाचा नारळ फुटला ॥

बघता बघता उभी जाहली, सुबक सुंदर वास्तू ।

त्रिलोकातूनी लाभले त्यास, मंगल वरदान तथास्तु ॥


होऊ दे मग जल्लोष आता, दणाणू दे आसमान ।

जन्मस्थळी होतायत आज, पुन्हा राघव विराजमान ॥

सजवा वाटा लावा पताका, चिंतुनी त्याचे नाम ।

एक मुखाने गरजा सारे, जय श्रीराम जय श्रीराम ॥


                                                 - निखिल.

https://www.instagram.com/reel/C2K-T1Cp867/?utm_source=ig_web_copy_link