Wednesday, October 9, 2019

Yash

सकाळ पासूनच गडबड सुरू झाली,
जेव्हा लागली बाळाची चाहूल..|
आनंद झाला द्विगुणीत,
जेव्हा दिसले ते चिमुकले पाऊल ||

क्षणार्धात ह्या पावलांनी,
उमटवला असा काळजावर ठसा |
उत्तरेला अढळ,
जणू धृव तारा जसा ||

अवतरता ह्या जगी,
लावला त्याने एकच सूर |
परमोच्च आनंदाने तेव्हा,
भरून आला ऊर ||

आभार त्या विधात्याचे,
जोडीतो हात अंती |
दिधली दोन रत्ने,
ओवी-यश संतती !!

                       - निखिल.