संध्याकाळच्या वेळी |
पण कुणास ठाउक कसा,
काल डोळा लागला कातरवेळी ||
मग काय..... मनाचा तो कप्पा उघडणार,
हे तर आता सत्य होतं |
ऐकलं माझ....... तर ते मन कसलं ,
अशाच वेळी ते व्रात्य होतं ||
नको नको म्हणून सुद्धा,
ते दार त्याने उघडलच |
आणि समजून उमजून मला,
पुन्हा त्या जगात ढकलंच ||
एक - एक, एक - एक आठवण आता,
फेर धरु लागली |
आठवणीच्या जगात आता ,
मनी कळी खुलू लागली ||
बालीशच ते मन माझं....,
बेभान होउन नाचत होतं |
स्वप्नांच्या त्या धबधब्यात,
नखशिखांत भिजत होतं ||
तुझ्या स्वप्नांच्या ह्या स्पर्धेमध्ये,
माझ मन नेहमीच हरत आल आहे |
आणि एकदा तुझ्याकडे आल्यावर ते,
कधी हसत परत आल आहे ?
माझ्याकडे सुद्धा आता,
बहुदा त्याला करमत नाही |
आणि तुझ्याशिवाय दुसर्या कशात म्हणे,
त्याचे मन रमत नाही ||
म्हणत मला वेडं ते ,
की आयुष्य मला जगायच आहे |
आणि पुन्हा एकदा मला आज,
कातरवेळी झोपायच आहे ||
-- निखिल .