डोक्याला जरा शांतता हवी,
आजकाल रोजच असं वाटतं |
विचारांच्या गर्दीमध्ये,
नकळत मन हरवतं ||
आपली आपली वाटणारी लोक,
नकळत दूर जातात |
जशी हातावरती रंग सोडून,
फुलपाखर हातून सुटून जातात ||
मैत्री मधला ओलावा काय,
मृगजळापरी असतो ? |
प्रत्येकाकडे कसा मग,
इथे रिता पेला असतो ? ||
घरापासून दूर,
इथे प्रत्येकाला घर आहे |
पण समाधानाने रहावं ,
असा कोणाला इथे वर आहे ? ||
एकांतात इथे ,
प्रत्येकाच्या कानगोष्टी चालतात |
मित्रांमधल्या गैरसमजाला ,
इथे तिरहाईत पुष्टि देतात ||
इतका अंतर येतं,
पण तोंड कोणी उघडत नाही |
हक्काने जाब विचारला,
म्हणून नातं कधी बिघडत नाही ||
"पण मीच का बोलू ", हे वारं,
नेमकं तेव्हाच मनी धावतं |
आणि ह्या मुर्खपणामध्ये ,
त्या तिरहाईताच फावतं ||
कुणाच्या तरी येण्याने,
आपण आपल्याच माणसांशी भांडतो |
आणि त्याच्याशी जुळवायला मगं,
का बरं तडजोड मांडतो ||
आपलं कोण परक कोण,
हे आज उमजेनास झालयं |
विश्वासाच फुल ,
आज उमलेनास झालयं ||
ह्या आजच्या अशा वळणावर,
आज खुप काही उमगलय |
आणि कुणाला किती जीव लावावा ,
हे आज आयुष्याने शिकवलय ||
-- निखिल.