अस्मानातूनी अवतरली आज,
परी आमुच्या घरी ।
निरागसतेचा झराच जणू ,
अन कांती अप्सरे परी ।।
इवले इवले डोळे तिचे ,
चिमुकले तिचे हात ।
काळजाचे करते पाणी पाणी ,
जेव्हा घालते रडकी साद ।।
छोटीशी ही बाहुली अमुची ,
लळा तिचा फार ।
आजी आजोबांनाही व्याकुळ करते ,
सातासमुद्रापार ।।
ओढ तिची ही अशी ,
वाटते सर्वा ती हवी हवी ।
देवा घरचा प्रसादच जणू ,
अन नाव तिचे ओवी ।।
-- निखिल
परी आमुच्या घरी ।
निरागसतेचा झराच जणू ,
अन कांती अप्सरे परी ।।
इवले इवले डोळे तिचे ,
चिमुकले तिचे हात ।
काळजाचे करते पाणी पाणी ,
जेव्हा घालते रडकी साद ।।
छोटीशी ही बाहुली अमुची ,
लळा तिचा फार ।
आजी आजोबांनाही व्याकुळ करते ,
सातासमुद्रापार ।।
ओढ तिची ही अशी ,
वाटते सर्वा ती हवी हवी ।
देवा घरचा प्रसादच जणू ,
अन नाव तिचे ओवी ।।
-- निखिल
No comments:
Post a Comment